फियान्सेऐवजी दुसरीलाच टॅग, ट्विपल्सकडून स्टीव्ह स्मिथची खिल्ली
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2018 11:12 AM (IST)
पण फियान्से डॅनी विल्ससोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करताना झालेल्या एका चुकीमुळे, ट्विपल्स स्टीव्ह स्मिथला चांगलंच ट्रोल करत आहेत.
मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला क्रिकेटसोबतच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला प्रचंड आवडतं. ट्विटर तसंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो कायम प्रत्येक गोष्ट अपडेट करत असतो. पण फियान्से डॅनी विल्ससोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करताना झालेल्या एका चुकीमुळे, ट्विपल्स स्टीव्ह स्मिथला चांगलंच ट्रोल करत आहेत. क्रिकेटशिवाय त्याचं फियान्से डॅनी विल्सची काळजीही तो प्राधान्याने घेतो. त्यामुळे या दोघांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या रॉजर फेडरर विरुद्ध मार्तोन फुकडोविकस यांच्यातील अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान डॅनी विल्ससोबतचा फोटो स्टिव्ह स्मिथने शेअर केला. पण फोटो शेअर करताना, त्याने फियान्सेला टॅग न करता, चुकून दुसऱ्याच महिलेला टॅग केलं. डॅनी विल्सचं हॅण्डल @DaniWillis91 आहे, मात्र स्मिथने @dani_willis या दुसऱ्याच महिलेच्या हॅण्डलला टॅग केलं. यानंतर नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ट्विपल्सकडून स्मिथची खिल्ली