नवी दिल्ली: टी20 विश्वचषक 2007 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आरपी सिंहला काल कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. आरपी सिंहची पत्नी देवांशीनं काल एका चिमुकलीला जन्म दिला. याबाबतची माहिती खुद्द आरपी सिंहनं सोशल मीडियावरुन दिली.

आरपी सिंहनं याबाबत ट्वीटही केलं आहे. 'याशिवाय दुसरी कोणतीही चांगली भावना असू शकत नाही. माझ्या आणि देवांशीच्या घरी एका चिमुकलीनं जन्म घेतला.'


सोशल मीडियावर या बातमीसोबतच आरपी सिंहनं आपल्या मुलीचं नावही जाहीर केलं. आरपी सिंहनं आपल्या मुलीचं नाव 'इरा आर्या सिंह' ठेवलं आहे.

आरपी सिंहनं दिलेल्या या गोड बातमीनंतर  त्याला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या. इरफान पठाण, मनोज तिवारी, गीता बसरा यांनी आरपी सिंहला शुभेच्छा दिल्या.