नवी दिल्ली : सोशल मीडियाद्वारे सात लाख लोकांना 3700 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नोएडातील अनुभव मित्तलमुळे अभिनेत्री सनी लिओनीच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हं आहेत. स्पेशल टास्क फोर्सतर्फे सनी लिओनीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील हॉटेल क्राऊन प्लाझामध्ये 29 नोव्हेंबर रोजी अनुभव मित्तलने पोर्टलच्या लॉन्चिंग पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सनी लिओनीसह अभिनेत्री अमिषा पटेलनेही हजेरी लावली होतं. त्यांचे फोटोही सार्वजनिक झाले होते.
फेसबुक पोस्ट लाईक करा, पैसे मिळवा, 3700 कोटींचा गंडा घालणारा महाठग
सनीने अनुभव मित्तलच्या कंपनीचं प्रमोशनही केलं होतं. मित्तल कंपनीच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सामील झाल्याने पोलिस चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
एसटीएफचे पोलिस उपअधीक्षक राज कुमार मिश्रा यांच्या माहितीनुसार, "प्राईज चिट्स अँड मनी सर्कुलेशन स्कीम अॅक्ट, 1978 अंतर्गत अशा प्रकारच्या स्कीमचं प्रमोशन बेकायदेशीर आहे. हॉटेल स्टफकडून पुरावे म्हणून आम्हाला राही फोटो मिळाले आहे. गरज भासल्याची त्यांचीही चौकशी होऊ शकते"