मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा शिलेदार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेहने आपल्या नवजात कन्येचं समायरा असं नामकरण केलं आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मेलबर्न कसोटीत विजय मिळवला, त्याच दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला रितिकाने बाळाला जम्न दिला. ही गोड बातमी कळताच रोहित रितिकाला आणि आपल्या नवजात कन्येला भेटण्यासाठी मेलबर्नहून मायदेशी परतला होता. त्यामुळे त्याला टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चौथ्या कसोटीला मुकावं लागलं. आता तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित आठ जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियात दाखल होईल. 'Hublot'च्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये रोहितने सर्वप्रथम रितिकाच्या प्रेगन्सीच्या बातमीला दुजोरा दिला होता. रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत गप्पा मारताना म्हटलं होतं की, "मी लवकरच बाबा होणार आहे आणि मी जास्त वाट पाहू शकत नाही. माझं आयुष्य बदलणारा हा क्षण आहे. मी याची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो." संबंधित बातम्या रोहित शर्माने मुलीचा पहिला फोटो शेअर केला रोहित शर्मा बाबा झाला