म्हणून मला तुझा अभिमान, उत्थप्पाकडून पत्नीचा फोटो शेअर
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2017 10:09 PM (IST)
आपल्या देशातील संस्कृती आणि समजांमुळे महिलांच्या मनात प्रेग्नंसीबाबत जी भीती आहे, ती दूर करण्यासाठी मी माझ्या पत्नीला यावर एक पुस्तक लिहिण्यास सांगत होतो. या काळात तिने समाजातील अनेक प्रस्थापित समज तोडले आहेत, असं क्रिकेटपटू रॉबिन उत्थप्पा पत्नी शीतलबाबत म्हणतो.
मुंबई : टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज रॉबिन उत्थप्पा लवकरच बाबा होणार आहे. उत्थप्पाने पत्नी शीतलचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपल्याला तिचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'जर कोणाला आई व्हायचं असेल, तर ती ही आहे. मला माझ्या पत्नीच्या गर्भावस्थेच्या प्रवासाचा अभिमान वाटतो. आपल्या देशातील संस्कृती आणि समजांमुळे महिलांच्या मनात प्रेग्नंसीबाबत जी भीती आहे, ती दूर करण्यासाठी मी माझ्या पत्नीला यावर एक पुस्तक लिहिण्यास सांगत होतो. या काळात तिने समाजातील अनेक प्रस्थापित समज तोडले आहेत. आय लव्ह यू स्वीटहार्ट. मला खात्री आहे की तू एक अद्भूत आई होणार आहेस' असं रॉबिनने लिहिलं आहे. रॉबिन आणि शीतलचं मार्च 2016 मध्ये लग्न झालं होतं. हे त्यांचं पहिलं अपत्य असणार आहे. काही दिवसांपूर्वीचं दोघंही अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करुन आले होते. रॉबिन उथप्पानं टीम इंडियासाठी 46 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळले असून दोन्हीमध्ये मिळून आतापर्यंत 1000 धावा केल्या आहेत.