राजकोट : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा बाबा बनला आहे. जाडेजाची पत्नी रिवाने राजकोटमधील रुग्णालयात मुलीला जन्म दिला.
मुलीच्या जन्मामुळे जाडेजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आणि बाळ सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
खरंतर पत्नीच्या प्रेग्नंसीदरम्यान आणि बाळाच्या जन्मावेळी रवींद्र जाडेला रिवासोत राहायचं होतं. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जाडेजा इंग्लंडमध्ये आहे.
17 एप्रिल, 2016 रोजी राजकोटमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवा सोळंकी यांचा शाही विवाह झाला होता.