टायगरच्या ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2017 08:52 AM (IST)
मुंबई : टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुन्ना मायकल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ ‘मुन्ना’च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वत: डान्सर असलेला टायगर सिनेमात नवाजुद्दिनलाही डान्स शिकवताना दिसतो. तीन मिनिटाचा हा ट्रेलर डान्स, अॅक्शनने भरलेला आहे. पॉप डान्सर मायकल जॅक्सनला या सिनेमातून टायगर अभिवादन करतो. मुन्ना नामक तरुणाच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असून, यातल्या मुन्नाला मायकल जॅक्सन प्रचंड आवडत असतो आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तो डान्स करत असतो. तर नवाजुद्दीन सिद्दिकी या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहे. डान्स शिकण्यासाठी नवाजुद्दीन टायगरकडे येतो आणि त्यावेळी काही विनोदी किस्से घडतात, असं एकंदरीत कथा असल्याची ट्रेलरवरुन लक्षात येतं. अभिनेत्री निधी अग्रवालही सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. निधीने याच सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. पाहा ट्रेलर :