यूपी निवडणुकांसाठी प्रवीण कुमार केवळ प्रचारकाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे. कारण तो या निवडणुकीसाठी उभा राहणार नसल्याचं त्याने 'एबीपी न्यूज'शी बोलताना सांगितलं. अखिलेश यादव यांचं काम आवडल्याने त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण त्यांची इच्छा असेल तर निवडणूकही लढवेल, असं प्रवीणने सांगितलं.
प्रवीणने सहा कसोटी आणि 68 वन-डे सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याच्या नावावर कसोटीत 27 आणि वन डेत 77 विकेट्स जमा आहेत. प्रवीण खराब फॉर्ममुळे 2012 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता राजकारणाच्या या नविन इनिंगमध्ये प्रवीण काय कमाल करतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.