मुंबई : क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होते.

 

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटीही गर्दी करतात, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी रांग असते. त्यातच आज सचिन तेंडुलकरने सहकुटुंब दर्शन घेतलं. लालबागच्या राजाला मनोभावे प्रार्थना करुन सचिन आपल्या कुटुंबासह रवाना झाला.

 

सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.