तिरुवअनंतपुरम : क्रिकेटच्या मैदानातून एक दुःखद घटना समोर आली आहे. केरळमधील कसारागोडच्या एका लोकल टुर्नामेंटमध्ये मैदानातच एका युवा खेळाडूचा मृत्यू झाला. पद्मनाभ जुडकाल्लू असं या तरुण क्रिकेटरचं नाव आहे.
गोलंदाजीसाठी रनअप घेतानाच पद्मनाभ जमिनीवर कोसळला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला, असं बोललं जात आहे. केरळमधील एका स्थानिक चॅनलने या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये पद्मनाभ मैदानात कोसळल्याचं दिसत आहे.
पद्मनाभ मैदानात कोसळताच पंच आणि इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. खेळताना अचानक झालेल्या हा दुर्दैवी मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.