Pakistan vs Zimbabwe 1st ODI : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. ज्याचा पहिला सामना 24 नोव्हेंबरला झिम्बाब्वेच्या बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये झिम्बाब्वेने मोठा अपसेट केला आहे. 


खरंतर, पहिल्या वनडेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला. पावसाचा व्यत्यय असलेला हा सामना झिम्बाब्वेने डीएलएस पद्धतीने 80 धावांनी जिंकला. मात्र झिम्बाब्वेने आपल्या गोलंदाजीने अर्ध्याहून अधिक पाकिस्तान संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.


सामन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. मात्र, सलामीवीर तदिवनाशे मारुमणी आणि जॉयलॉर्ड गुंबीने वेगवान सुरुवात करून यजमानांना 50 धावांच्या पुढे नेले. मात्र गैरसमजामुळे गुंबी धावबाद झाला. यानंतर पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज सलमान अली आगा आणि सॅम अयुब यांनी झिम्बाब्वेच्या मधल्या फळीवर दबाव आणला. कर्णधार क्रेग एर्विन आणि डिऑन मायर्स हेही फार काळ टिकू शकले नाहीत.






झिम्बाब्वेला 150 धावांपर्यंतही मजल मारता येणार नाही असे वाटत असतानाच सिकंदर रझा आणि रिचर्ड नगारावा यांनी 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नागरवाने पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्याने सामना करत 48 धावा केल्या, तर रझाने 49 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या मदतीने झिम्बाब्वेने 205 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन यांनी चांगली गोलंदाजी केली.


लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. वेगवान गोलंदाज आशीर्वाद मुझाराबानीने अब्दुल्ला शफीकला खाते न उघडता बाद केले आणि त्यानंतर लगेचच सॅम अयुबही बाद झाला. यानंतर झिम्बाब्वेच्या फिरकीपटूंनी कहर केला.


शॉन विल्यम्स आणि सिकंदर रझा या जोडीने पाकिस्तानची मधली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. विल्यम्सने कामरान गुलाम आणि इरफान खानचे बळी घेतले, तर रझाने सलमान अली आगा आणि हसीबुल्ला खान यांना बाद करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले.


21 षटकांत पाकिस्तानची धावसंख्या 6 गडी गमावून 60 धावा होती. पावसामुळे सामना थांबवण्यात आला. नंतर झिम्बाब्वेने पहिला एकदिवसीय सामना DLS पद्धतीने 80 धावांनी जिंकला.


हे ही वाचा -


Venkatesh Iyer IPL Mega Auction 2025 : धडाकेबाज व्यंकटेश अय्यरसाठी शाहरुख खानने लावली सर्व ताकद... KKRने ओतला पाण्यासारखा पैसा


Ishan Kishan : काव्या मारनने नीता अंबानींच्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू फोडला! इशान किशनसोबत केली इतक्या कोटींची डील