India tour of Zimbabwe: झिब्बावेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतानं (ZIM vs IND) तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. या विजयासह भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. भारताच्या विजयात विकेटकिपर संजू सॅमसननं (Sanju Samson) दमदार कामगिरी करून दाखवली. ज्यामुळं त्याला सामनावीर (Man Of The Match) म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान, सामनावीराचा पुरस्कार जिंकून संजू सॅमसननं खास विक्रमाला गवसणी घातलीय. झिम्बाब्वे दौऱ्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा संजू सॅमसन पहिला भारतीय विकेटकिपर ठरलाय. 


संजू सॅमसनचं दमदार प्रदर्शन
झिम्बाब्वे दौऱ्यात आतापर्यंत कोणत्याही भारतीय विकेटकिपरला सामनावीरचा पुरस्कार जिंकता आला नव्हता. झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं 39 चेंडूत नाबाद 43 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात संजू सॅमसननं 110.26 स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली.


भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज ढेपाळले
या सामन्यात नाणेफक जिंकल्यानंतर भारतानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिब्बाब्वेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 161 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, रायन बर्लेनं नाबाद 39 धावांचं योगदान दिलं. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराज, दीपक हुडा, फेमस कृष्णा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


भारतानं पाच विकेट्सनं सामना जिंकला
झिम्बाब्वेनं दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रुपात पहिला झटका बसला. या सामन्यात केएल राहुलला फक्त एक धाव करता आली. त्यानंतर धवन आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. मात्र, 21 चेंडूत 33 धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर इशान किशनही 6 धावा करून बाद झाला. गिलही 34 चेंडूत 33 धावा केल्यानंतर काही वेळानं बाद झाला. दरम्यान, संजू सॅमसननं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवत भारताला सामना जिंकून दिला. 


भारताची मालिकेत 2-0 नं आघाडी
झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं झिब्बावेच्या संघाला 10 विकेट्सनं पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्सनं विजय मिळवत मालिकेकवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल, जो 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाईल.


हे देखील वाचा-