Yuvraj Singh Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात जातीय भाष्य केल्याबद्दल अटक करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात, रजत कलसन नावाच्या वकिलांनी हिसारच्या हांसीच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. युवराज सिंगने गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान सहकारी खेळाडू युझवेंद्र चहलबद्दल जातीयवादी टिप्पणी केली होती, ज्यावर संपूर्ण देशात प्रचंड गोंधळ उडाला होता.


सोशल मीडियावर मागितली होती माफी 
गेल्या वर्षी ही बाब उघडकीस आली तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर युवराज सिंगने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपली खंत व्यक्त केली. आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला असल्याचेही तो म्हणाले. त्यानंतर हे प्रकरण अनेक दिवस सोशल मीडियावर ट्रेंडिंग होते.


युवराज सिंगने टीम इंडियासाठी 304 एकदिवसीय, 58 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत. 2011 मध्ये टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात मदत करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.