मुंबई : भारताचा स्टार गोलंदाज आर. अश्विनने यंदाच्या वर्ष सरता-सरता एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. टी20 स्पेशलिस्टपासून टेस्ट क्रिकेटपर्यंतच्या भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या स्पिनरने मागील 10 वर्षांत खासकरून घरगुती मैदानावर उत्तम कामगिरी केली आहे.


सगळ्याच फॉर्मेटमध्ये 564 विकेट्स घेत अश्विन या दशकातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यानंतर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स एंडरसन असून त्याच्या नावाने 535 विकेट्स आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर 525 विकेट्स घेत स्टुअर्ट ब्रॉड आहे. न्यूझिलॅन्ड क्रिकेट संघातील पेसर टिम साउथी आणि ट्रेंट बोल्ट या यादीत टॉप 5मध्ये आहेत. त्याच्या नावे 472 आणि 458 विकेट्स आहेत.


फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत सर्वोच्च स्थानावर असून त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावरील फलंदाजाच्या धावसंख्येमध्ये मोठा फरक आहे. विराटने या दशकात 5575 आंतराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तर 22 शतकं ठोकली आहेत. आतापर्यंत कोणताच फलंदाज अशी कामगिरी करू शकलेला नाही.

गोलंदाज आणि फलंदाजांबाबत बोलायचं झालं तर भारतीय गोलंदाज आणि फलंदाज टॉप स्कोअरर आहेत. भारतीय संघाने या दहा वर्षांत एक वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. तसेच कसोटी समान्यांमध्ये अव्वल संघ म्हणून मान पटकावला आहे. म्हणजेच, हे दशक भारतीय संघासाठी दमदार होतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.