Continues below advertisement


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल होत आहेत. भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी शुभमन गिलला कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. तर ,विराट कोहलीनं देखील इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यापूर्वी कसोटीतून निवृत्ती घेतली होती. आता, वनडेच्या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर होत असताना आणखी एका युवा खेळाडूनं कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या युवा खेळाडूचं नाव यशस्वी जयस्वाल आहे.


Yashasvi Jaiswal : मला पण कर्णधार व्हायचंय 


भारताच्या संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल यानं राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत मन की बात सांगितली. जयस्वालनं म्हटलं की तो प्रत्येक दिवशी फिटनेस आणि कौशल्यावर काम करत आहे. स्वत:ला चांगलं बनवण्यासाठी शरीरावर मेहनत करणं आवश्यक आहे. मला वाटतं की मला अजून फिट होण्याची गरज आहे. मी स्वत: वर इतकं काम करु इच्छितो की मी चांगला लीडर बनू शकेल. येत्या काळात एका टीमचा कर्णधार व्हायचं आहे, असं यशस्वी जयस्वालनं म्हटलं.


यशस्वी जयस्वालचं क्रिकेट करिअर


यशस्वी जयस्वाल भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आहे. जयस्वालनं भारताकडून कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये सामने खेळले आहेत.


जयस्वालनं भारताकडून 25 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 49.88 च्या सरासरीनं 3390 धावा केल्या आहेत. तर, जयस्वालनं कसोटीत सर्वाधिक 214 धावा केल्या आहेत.


यशस्वी जयस्वालनं भारतासाठी केवळ एक वनडे मॅच खेळली आहे. तर, टी 20 मध्ये 23 धावांमध्ये 36.15 च्या सरासरीनं 723 धावा केल्या आहेत. टी 20 यशस्वी जयस्वालच्या नावावर 1 शतक आणि 5 अर्धशतकं आहेत.


यशस्वी जयस्वालची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघात निवड झाली आहे. यशस्वी जयस्वाल सध्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर आहे.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडेसाठी भारताचा संघ


शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ


सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार,तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी,शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर