ICC World Test Championship Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल अवघ्या काही तासात रंगणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये आठ संघामध्ये WTC साठी लढत सुरु होती. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. 2021 ते 2023 यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 152 गुण आणि 66.67 टक्के कसोटी सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत 127 गुण आणि 58.8 टक्केंसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.  


 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारताची तयारी जोरात सुरू आहे. या विजेतेपदासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही विजेतेपदाची लढत ७ जूनपासून सुरू होणार आहे. 


When will the WTC Final 2023 be played? कधी रंगणार थरार -


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीची फायनल सात जून 2023 पासून सुरु होणार आहे. 
 
Where will the WTC Final 2023 be held? कुठे रंगणार सामना?


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे.


कधी सुरु होणार सामना ?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याचा थरार दुपारी अडीच वाजता सुरु होईल. 
 
Where can the WTC final 2023 be watched on television? टीव्हीवर लाईव्ह सामना कुठे पाहाल ?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाला मिळेल. 
 
Will Live Streaming be available for the WTC final 2023? लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळेल?


डिस्नी हॉटस्टार Disney+Hotstar अॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यासंदर्भात सर्व माहिती मिळणार आहे.


India vs Australia, Complete squads for ICC World Test Championship final : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कोण कोणते खेळाडू आहेत ?


India Squad For WTC Final :


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 


Australia Squad For WTC Final : 


पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.