Yash Dayal Ranji Trophy 2025 : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज यश दयालला संघात संधी मिळालेली नाही. बीसीसीआयने टीम इंडियातून त्याची सुट्टी केली आहे, मात्र पठ्ठ्याने रणजी ट्रॉफीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्याने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. त्यामुळे संघ निवडकर्त्यांनाही आपल्या निर्णयाचा विचार करायला भाग पाडेल आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत निवड न झाल्याने यश दयालने रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. बंगालविरुद्धच्या सामन्यात त्याने उत्तर प्रदेशकडून शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले. बंगालचा पहिला डाव 311 धावांवर आटोपला. दयालने बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनसह 4 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने 14.2 षटकात 5 मेडन्स केले आणि 27 धावांत 4 बळी घेतले. त्याने 71 डॉट बॉल टाकले.
यश दयालने कोणाची विकेट घेतली?
यश दयालने सर्वप्रथम अभिमन्यू ईश्वरनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 5 धावा केल्या. याशिवाय त्याने शाहबाज अहमदला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 44 धावा केल्या. याशिवाय सूरज सिंधू जैस्वाललाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात आला. त्याने 15 धावा केल्या. यश दयालची शेवटची विकेट मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफची होती. त्याने 7 धावा केल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यश दयालला संधी मिळालेली नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत आता त्याला पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश होऊ शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आनंदाची बातमी
यश दयाल यांची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) आनंदाची बातमी आहे. आयपीएल मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझींना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन्शन लिस्ट सादर करायची आहे. याआधी यश दयाल अनकॅप्ड राहतील. अशा स्थितीत त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. यासाठी आरसीबीला 4 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
हे ही वाचा -