ICC WTC Points Table Updated after AUS vs ENG 1st Test : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पर्थच्या मैदानावर फक्त दोन दिवसांत कंगारूंनी इंग्लिश संघाला गुंडाळून टाकलं. इंग्लंडने दिलेलं 205 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अगदी तुफानी शैलीत पार केलं. ट्रॅव्हिस हेडने वादळी खेळी खेळत इंग्लिश गोलंदाजांना धू-धू धुतले. या जबरदस्त विजयाचा फायदा ऑस्ट्रेलियाला WTC पॉइंट्स टेबलमध्येही मोठ्या प्रमाणात झाला असून इंग्लंडची स्थिती आणखीच बिकट झाली आहे. टीम इंडिया अजून चौथ्या स्थानी आहे. (Latest World Test Championship Table After First Ashes Test Ends in Two Days)

Continues below advertisement

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

पहिल्या कसोटीतील संस्मरणीय विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. कांगारूंनी या चक्रात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. संघाचा विजयाची टक्केवारी 100 आहे. दुसरीकडे, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 66.67 आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. 54.17 टक्केवारीसह भारत टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

Continues below advertisement

इंग्लंडची अडचण वाढली

दोन सामन्यांपैकी एका विजयासह पाकिस्तान WTC पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे, परंतु त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इंग्लंडचा एकूण विजयाची टक्केवारी 36.11 आहे. बांगलादेश सातव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे.

फक्त दोन दिवसांत काम तमाम!

पहिलाच कसोटी सामना आणि तोही दीड-दोन दिवसांत संपलेला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजीसमोर इंग्लंड पूर्णपणे फेल ठरली. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड यांनी सलामी भागीदारी केली. वेदराल्ड 23 धावांवर बाद झाला, पण हेडनं इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

ट्रॅव्हिस हेडने आधी 36 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, मग 69 चेंडूंमध्ये शतक ठोकले. एकूणच 83 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. यादरम्यान, त्याने 16 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारले. इंग्लिश गोलंदाजी हेडसमोर पूर्णपणे हतबल झाली. त्याच वेळी नंबर तीनवर आलेल्या मार्नस लाबुशेननंही 49 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे ही वाचा -

Aus vs Eng 1st Test : दीड दिवसात कसोटी सामना संपला! पर्थची खेळपट्टी इंग्लंडसाठी ठरली कर्दनकाळ, ट्रॅव्हिस हेडची तुफानी खेळी, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय