WTC points table after England vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका संपली आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली असेल, पण श्रीलंकेच्या संघाने तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कमालीचा बदल घडवून आणला आहे. सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने मोठी झेप घेतली आहे. तर इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यातील पराभवामुळे संघ पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया आहे तरी कुठे?
जर आपण आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, टीम इंडिया अजूनही आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतीय संघाचा 68.52 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, त्याची गुण 62.5 आहे. या आघाडीच्या दोन संघांनंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. न्यूझीलंड संघ सध्या 50 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेने घेतली मोठी झेप
दरम्यान, बांगलादेश संघाने सलग दोन सामन्यांत पाकिस्तानला पराभूत करून चौथ्या क्रमांकावर कब्जा केला होता. त्याचे गुण सध्या 45.83 आहे. आता अखेरच्या कसोटीत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने मोठी झेप घेत थेट पाचव्या क्रमांकावर कब्जा केला आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंका संघाचे गुण 33.33 होते, जे अचानक वाढून 42.85 झाले आहेत. याआधी संघ सातव्या क्रमांकावर झगडत होता, मात्र आता अव्वल पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यश मिळविले आहे.
श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडची घसरण
जर आपण इंग्लंडबद्दल बोललो तर, संघाने पहिल्या दोन कसोटीत श्रीलंकेला पराभूत केले आणि यामुळे 45 गुणासह ते पाचव्या स्थानावर पोहोचले, परंतु आता पुन्हा खाली जावे लागेल आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे गुण 45 होते, ते आता 42.18 वर आले आहे. एकही सामना गमावल्याने संघाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु निश्चितपणे असे घडले आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुण टेबल खूपच मनोरंजक बनले आहे.
हे ही वाचा -
END vs SL 3rd Test : 10 वर्षांनंतर श्रीलंकेचा टेस्ट क्रिकटमध्ये मोठा पराक्रम; इंग्लंडचे स्वप्न भंगले