WTC Points Table 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यादरम्यान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला, ज्यामध्ये यजमान किवी संघाने इंग्लंडचा 423 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह त्याने मालिकेतील आपला क्लीन स्वीप तर टाळला. न्यूझीलंडच्या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली असली तरी गुणतालिकेत इंग्लिश संघ अजूनही किवी संघाच्या खाली आहे.
न्यूझीलंड चौथ्या पोहोचला स्थानावर
मालिकेतील शेवटचा सामना जिंकून न्यूझीलंडने टीम साऊथीला शानदार निरोप दिला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीचा हा शेवटचा कसोटी सामना होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेणार असल्याचे टीम साऊदीने आधीच जाहीर केले होते.
अशाप्रकारे ही त्याची कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरली. सौदीच्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने मोठ्या फरकाने विजय मिळवला, पण मालिकेवर कब्जा करता आला नाही. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने इंग्लंडने आधीच जिंकले होते.
आता या विजयानंतर न्यूझीलंड संघाने डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये फायदा मिळवला आहे. न्यूझीलंडचा संघ आता श्रीलंकेला मागे टाकत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय श्रीलंका संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे, तर इंग्लंड संघ सहाव्या स्थानावर कायम आहे. बाकी कुठे काही बदल झाला नाही.
इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली
पहिली कसोटी इंग्लंडने 8 विकेटने जिंकली. तर दुसऱ्या कसोटीत 323 धावांनी मोठा विजय नोंदवला. मालिकेतील तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने विजयासाठी 658 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 234 धावा करू शकला आणि सामना गमावला. अशाप्रकारे मालिकेचा निकाल 2-1 असा इंग्लंडच्या बाजूने लागला.
हे ही वाचा -
Rohit Sharma : टी-20 नंतर कसोटी क्रिकेटमधूनही रोहित शर्माचा 'The End'?; आकडेवारी पाहून चर्चांना उधाण