WTC Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडने आठ विकेट्सने जिंकला. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं. अनेकांनी भारत चुकीच्या बॉलिंग कॉम्बीनेशनसह मैदानात उतरल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंग यांनीही यावर आपले मत मांडले आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळवले गेले नाही ही मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


शार्दूल हा 15 सदस्यीय संघात नव्हता, त्यामुळे पाऊस झाल्यानंतर साऊथॅम्प्टनमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करता आले नाही.


यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाच्या विजयानंतर सरनदीप यांचा कार्यकाळ संपला होता. डब्ल्यूटीसी फायनल आणि चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भुवनेश्वरची निवड न करणे निराशाजनक असल्याचे त्याने सांगितले.


सरनदीप म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी प्लेइंग इलेव्हनची निवड झाली होती, त्यामध्ये दोन फिरकी गोलंदाजांची उपस्थिती चांगली होती. पण, यात बदल करायला हवा होता. कारण (पाऊस पडल्यानंतर) वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल बनली होती."


WTC 2021 : सचिन तेंडुलकरने सांगितले जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवाचे कारण


"तुम्ही दोन फिरकीपटू (रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा) निवडले. कारण ते फलंदाजी करू शकतात. मात्र, फलंदाजी करणारा एकमेव वेगवान गोलंदाज शार्दुल आहे आणि तो 15 सदस्यीय संघातही नव्हता. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतो किंवा नाही. पण, त्याला 15 सदस्यीय संघात असायला हवे होते."


पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नेमलेल्या भुवनेश्वरच्या संदर्भात सरनदीप म्हणाले की, इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या संघात वेगवान गोलंदाजांची निवड व्हायला हवी होती. "भुवनेश्वरला इंग्लंड घेऊन न जाणे ही मोठी चूक आहे. तो आपला सर्वोत्तम स्विंग गोलंदाज आहे आणि तरीही तो संघात नाही,"


शार्दुलसारख्या एखाद्या वेगवान गोलंदाजाला अष्टपैलू म्हणून पारखण्याची वेळ आली आहे, असे सरनदीप यांनी सांगितले. कारण हार्दिक पंड्या कसोटी फॉरमॅटमध्ये गोलंदाजीसाठी फिट नाही. ते म्हणाले, "तुम्ही फक्त हार्दिकवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व फॉर्मेटमध्ये तो गोलंदाजीसाठी कधी फिट असेल हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे शार्दुलसारखा कोणी तयार होणे आवश्यक आहे किंवा विजय शंकर किंवा शिवम दुबे देखील तिथे आहेत,"


इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजला नियमित संधी मिळेल अशी आशा सरनदीप यांनी व्यक्त केली. सिराजला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. त्याने जितके शक्य तितके सामने खेळायला हवेत. तो चांगली गोलंदाजी करीत आहे. जर त्याला संधी मिळाली नाही तर त्याला योग्य लेंथ आणि लांबीसह गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते."