Sachin Tendulkar on WTC Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 23 जून या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. न्यूझीलंडने हा सामना आठ विकेट्सने जिंकला. या पावसामुळे व्यत्यय आल्याने सामन्याचा निकाल यायला सहावा दिवस उजाडावा लागला. वास्तविक, या ऐतिहासिक सामन्यात आयसीसीने एक राखीव दिवस ठेवला होता. या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारत उतरला होता. त्याचवेळी इंग्लंडने त्यांच्या संघात चार वेगवान गोलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला होता. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं. अनेकांनी भारत चुकीच्या बॉलिंग कॉम्बीनेशनसह मैदानात उतरल्याचे सांगितले. आता 'क्रिकेटचा देव' म्हणून प्रसिद्ध असलेला माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.


विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या गोलंदाजीच्या संयोजनात भारतीय संघ व्यवस्थापनाने चूक केल्याचे सचिनने म्हटले आहे. रवींद्र जडेजाकडून कमी गोलंदाजी करणंही चुकीचं ठरलं. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम असलेल्या सचिनने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की पहिल्या काही दिवसात सूर्यप्रकाश नसल्यामुळे फिरकीपटू कधी खेळात येऊ शकले नाहीत. विशेषत: डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा ज्याने पहिल्या डावात फक्त 7.2 षटके टाकली. त्याचवेळी, सहाव्या दिवशी जडेजाने दुसर्‍या डावात फक्त आठ षटके फेकली.


सचिन म्हणाला, "जेव्हा तुम्ही पाच गोलंदाजांसह खेळता तेव्हा सर्व पाच गोलंदाजांना समान षटके मिळणे अशक्य आहे. हे त्या प्रकारे काम करत नाही. आपल्याला खेळपट्टीची स्थिती, ओव्हरहेडची स्थिती, वाऱ्याची साथ या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो."


सचिनने पुढे म्हटले आहे की, रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात जडेजा (7.2-2-20-1) यांच्यापेक्षा जास्त षटके (15-5-28-2) टाकली, याच्या पाठीमागचा तर्क समजून घ्या. कारण न्यूझीलंडच्या डावखुऱ्या फलंदाजांनी फूटमार्क केले होते. विरोधी संघाकडे डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे दुसर्‍या डावात जडेजाला दुर्दैवी म्हटले.


100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या एकमेव फलंदाजाने सांगितले की साऊथॅम्प्टनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे, स्पिनर्ससाठी नाही. तो म्हणाला, की "जर गोलंदाजांना समान संधी मिळाली नाही तर याचा अर्थ वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. स्पिनर्स आणि वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्ट्या आहेत. त्यामुळे आपल्याला परिस्थिती समजून घ्यावी लागेल,"