WTC Final 2023, Ishan Kishan : दुखातपतीमुळे केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आज याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. केएल राहुलच्या जागी ईशान किशन याला संधी दिली आहे. आरसीबीविरोधातील सामन्यादरम्यान केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकला आहे.  बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी ईशान किशन याची निवड केली आहे. ईशान किशन सलामीला चांगला पर्याय आहे.. मधल्या फळीत तसेच सलामीला ईशान प्रभावी कामगिरी करु शकेल. 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडिया  India’s squad for WTC final : 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 


Standby players: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार.






टीम ऑस्ट्रेलिया


पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.


टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण
आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत हे दिग्गजही दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून बाहेर गेलेत. त्याशिवाय जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांनाही थोडीफार दुखापत असल्याचे समोर आलेय.आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत हे दिग्गजही दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून बाहेर गेलेत. त्याशिवाय जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांनाही थोडीफार दुखापत असल्याचे समोर आलेय.