Mumbai Indians Retention WPL 2025 मुंबई : मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. भारतासह विदेशी खेळाडूंना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. यास्टिक भाटिया, नट साइवर-ब्रंट आणि पूजा वस्तारकर यांना देखील रिटेन करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात मुंबईचा संघ तुल्यबल असल्याचं दिसून येतं. संजना संजीवन आणि साइका इशाक यांना देखील रिटेन्शन लिस्टमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
मुंबई इंडियन्सनं 14 रिटेन केलं तर 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.मुंबईनं प्रियंका बाला, फातिमा जफर, हुमैरा काजी आणि इस्सी वोंग यंना रिलीज केलं आहे. रिटेंशन लिस्ट मध्ये नट साइवर, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन आणि अमनजोत कौर यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सकडे अजून 2.5 कोटी रुपये बाकी आहेत.
मुंबईकडून भारताच्या 9 खेळाडूंना रिटेन
मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीगसाठी 9 भारतीय खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, अमनदीप कौर, अमनजोत कौर, कीर्तन बालाकृष्णन, जिंतिमनी कलिता, पूजा वस्तारकर, साइका इशाक, संजना संजीवन आणि यास्टिका भाटिया यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या एका खेळाडूला देखील रिटेन करण्यात आलं आहे. अमेलिया केरला मुंबई इंडियन्सनं रिटेन केलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकाचेया दोन खेळाडूंना रिटेन करण्यात आलं आहे.
2024 च्या डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईची कामगिरी कशी होती?
मुंबई इंडियन्सनं डब्ल्यूपीएलमध्ये 2024 मध्ये शानदार कामगिरी केली होती. मुंबईनं 8 मॅच खेळल्या होत्या त्यापैकी 5 जिंकल्या तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुंबई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिली होती. प्लेऑमध्ये मुंबईनं क्वालीफाय केलं होतं, एलिमिनेटरच्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 5 धावांनी पराभव झाला होता.
मुंबईनं कुणाला रिटेन केलं?
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), पूजा वस्तारकर, यास्तिका भाटिया, नट साइवर-ब्रंट, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, साइका इशाक, जिंतिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल
रिलीज : प्रियंका बाला, हुमैरा काजी, फातिमा जाफ़र, इस्सी वोंग
मुंबईच्या पर्समध्ये किती शिल्लक : 2.65 कोटी रुपये
इतर बातम्या :