IND vs SA : आफ्रिकेला पुन्हा धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज, सूर्यकुमार यादव कुणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. वेगवान गोलंदाज यश दयाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी येऊ शकते. तर, तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल. तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल.
हार्दिक पांड्या देखील संघात अनुभवी खेळाडू म्हणून असेल. त्याच्यासह रमणदीप सिंह याला देखील ऑलराऊंडर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला संधी मिळाल्यास तो देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.
रिंकू सिंगला मधल्या फळीत भारतीय संघासाठी फिनिशर म्हणून भूमिका पार पाडेल. फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल संघाचं नेतृत्व करेल. त्यासोबत वरुण चक्रवर्ती देखील असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि आवेश खानवर असेल.
भारताचा संभाव्य संघ: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमनदीप सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.