WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (6 मार्च) हंगामातील चौथा सामना खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने विजयाने सुरुवात केली आहे. त्याचवेळी आरसीबीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सोमवारी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात होणाऱ्या सामन्यात चुरशीची लढत होणार यात शंका नाही. या सामन्यात मुंबई संघाची नजर सलग दुसऱ्या विजयाकडे असेल. यासोबतच बंगळुरूचा संघ पहिला विजय नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेल, कारण दोन्ही संघात दमदार खेळाडूंचा भरणा असून मुंबईची मदार कर्णधार हरमनप्रीतवर तर आरसीबीची स्मृती मानधनावर आहे. सलामीच्या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला तर 5 मार्च रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स संघाचा 60 धावांनी पराभव केला. त्यामुळे आरसीबी संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या नजरा विजयाकडे असतील. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यात लढत होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची कर्णधार आहे तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे.
सामना कधी होणार?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 6 मार्च रोजी सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
WPL 2023 मध्ये कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
हे देखील वाचा-