WPL 2023, MI vs GG :  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत दमदार फॉर्मात असणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात जायंट्सविरुद्ध (MI vs GG) मैदानात उतरत आहे. गुजरात जायंट्सनं नाणेफेक जिंकत नुकतीच गोलंदाजी निवडली आहे.  महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर गुजरातला केवळ एकच सामना चार पैकी जिंकता आलेला आहे. दरम्यान मुंबई आणि गुजरात दोन्ही संघात दमदार खेळाडूंचा भरणा असून गुजरातची कर्णधार बेथ मूनी दुखापतीमुळे आजही सामन्यात नसून स्नेह राणा नेतृत्त्व करत आहे. तर मुंबईची कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरवर आहे. 


कसे आहेत दोन्ही संघ?


कमाल फॉर्मात असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्या अंतिम 11 मध्ये एकही बदल केलेला नाही. याआधीच्या सामन्यातील अंतिम 11 घेऊनच ते मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे गुजरात संघानं मात्र दोन बदल केले असून लॉरा आणि जॉर्जिया या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर डंकले आणि बेल यांना अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं आहे. तर नेमकी दोघांची अंतिम 11 कशी आहे पाहूया...


गुजरात जायंट्सचा संघ : सभिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅश्ले गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकिपर), किम गर्थ, तनुजा कंवर, स्नेह राणा (कर्णधार), मानसी जोशी


मुंबई इंडियन्सचा संघ : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकिपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुजर, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक


कधी, कुठे पाहाल सामना?


मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 14 मार्च रोजी सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.  सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल. रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-