Bangladesh vs England T20 Series : एकावेळी अंडरडॉग समजला जाणारा बांगलादेश क्रिकेट संघ (bangladesh Cricket team) मागील काही वर्षात सर्वच क्रिकेच प्रकारात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आता त्यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी इंग्लंडला टी20 मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईटवॉश दिला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियानंतर अशी कामगिरी करणारा बांगलादेश हा दुसराच संघ आहे. मंगळवारी (14 मार्च) मीरपूर येथे झालेल्या तिसऱ्या T20I सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत बांगलादेशनं T20I मालिकेत 3-0 असा विजय मिळवला.
इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळण्यासाठी आला होता. ज्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने यावेळी खेळवले जाणार होती. यातील एकदिवसीय मालिका इंग्लंडनं 2-1 नं जिकली. पण त्यानंतरची टी20 मालिका 3-0 अशा दमदार फरकानं जिंकत बांगलादेशनं इतिहास रचला. यावेळी पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्या 4 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी जिंकत बांगलादेशनं मालिकेत इंग्लंडला क्लीनस्विप दिली आहे.
अखेरच्या सामन्यात जोस बटलरच्या खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ज्यानंतर सलामीवीर लिटन दासच्या 57 चेंडूत 73 धावांच्या जोरावर बांगलादेशनं 2 बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमानांनी सुरुवात करण्यापूर्वी जोस बटलर आणि डेविड मलानच्या बळावर इंग्लंडने 13 षटकांत 1 बाद 100 धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने दोन तर कर्णधार शकीब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी एक बळी घेतला. मागील वेळीचा टी20 विश्वचषक चॅम्पियन असलेल्या इंग्लंडने सहा बाद 142 धावांवर शरणागती पत्करली. इंग्लंडला मागील नऊ वर्षांत पहिल्यांजाच टी20 मालिकेत व्हाईटवॉश मिळाला आहे. 2014 मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर 3-0 असा विजय नोंदवताना इंग्लंडला व्हाईटवॉश दिला होता. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ होता. त्यानंतर बांगलादेशनं प्रथमच अशी कामगिरी केली आहे. 2021 च्या T20 विश्वचषकापूर्वी, बांगलादेशने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला 4-1 ने नमवले आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर 3-2 ने पराभूत केले. या विजयाने बांगलादेशच्या पूर्ण सदस्य संघाला व्हाईटवॉश देण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला.
एकदिवसीय मालिका इंग्लंडनं जिंकली
इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळण्यासाठी आला होता. तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने यावेळी खेळवले जाणार होते. 1 मार्चपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात पहिल्या तीन वन-डे सामन्यातील पहिले दोन सामने अनुक्रमे तीन विकेट्स आणि 132 धावांनी बांगलादेशनं गमावले. अखेरचा सामना 50 धाावंनी जिंकला असला तरी मालिका इंग्लंडनं 2-1 नं जिकली.
हे देखील वाचा-