WPL 2023 News : यंदा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएलचं (WPL 2023) आयोजन केलं जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं यंदा महिला आयपीएल अर्थात वुमेन्स प्रिमीयर प्रिमियर लीग (WPL) या स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी एक भव्य असा लिलाव पार पडला. ज्यात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंवरही पैशांची बरसात झाली. दरम्यान आता सामन्यांसाठी काही दिवसच शिल्लक असून सर्व संघ आपआपली संघबांधणी करत आहे. तसंच कर्णधार आणि उपकर्णधार देखील जाहीर करत असून आतापर्यंत स्पर्धेतील पाच पैकी तीन संघांनी आपले कर्णधार जाहीर केले आहेत. ज्यानंतर आता आता युपी वॉरियर्झ संघाने कर्णधारासह आपल्या उपकर्णधाराच्या नावाची देखील घोषणा केली. भारतीय संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.






लिलावात यूपीच्या संघाने बऱ्याच दमदार खेळाडूंवर बोली लावत एक मजबूत संघ तयार केला असून या 16 सदस्यीय संघात आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. संघाने ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर यष्टीरक्षक एलिसा हिला हिला मोठी रक्कम देऊन खरेदी केलं. तिचा दमदार अनुभव पाहता संघाने तिची निवड कर्णधार म्हणून केली. तर उपकर्णधार म्हणून दीप्ती शर्मा हिला निवडण्यात आलं आहे.


तब्बल 2 कोटी 60 लाखांना विकत घेतलं शर्माला


युपी संघाने बऱ्याच खेळाडूंवर पैसे खर्च केले. पण यामध्ये त्यांनी तब्बल 2 कोटी 60 लाख अशी मोठी रक्कम दीप्ती शर्मा हिला दिली. युपीस्थित क्रिकेटर असणारी दीप्ती युपी संघासाठी डॉमेस्टिक क्रिकेटही खेळते. आता आयपीएलमध्येही ती युपी संघाचं नाव मोठं करणार आहे. दरम्यान याशिवाय युपी संघाने ताहिला मॅकग्रा या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूसाठीही 1.40 कोटी रुपये मोजले असून नेमका युपीचा संघ कसा आहे पाहूया...


WPL 2023 साठी युपी वॉरियर्झ संघ-


सोफी एक्लस्टन, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), तहलिया मॅकग्रा, शबनम इस्माइल, एलिसा हिली (कर्णधार), अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्ववी चोपडा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.


हे देखील वाचा-