WPL 2023, RCB vs DC :महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DL) या दोन संघांमध्ये सामना होत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान आतापर्यंत बहुतेक WPL सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होत असताना दिल्लीनं काहीसं वेगळा निर्णय घेतला आहे. एकीकडे रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत खेळलेले सर्वच्या सर्व चारही सामने गमावले आहेत. आजतरी ते आपला पहिला विजय मिळवलतील का? हे पाहावे लागेल. तर ऑस्ट्रेलियाला नुकताच विश्वचषक जिंकवून देणारी कर्णधार मेग लॅनिंगने दिल्ली कॅपिटल्स संघाला चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
दिल्ली कॅपिटल्सचे अंतिम 11: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अंतिम 11 : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस
कधी, कुठे पाहाल सामना?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये होणारा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नुकतीच नाणेफेक झाली आहे. दरम्यान या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
नुकताच दिल्लीचा गुजरातवर मोठा विजय
शनिवारी म्हणजेच 11 मार्चला गुजरात जायंट्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे (Gujrat Giants vs Delhi capitals) आव्हान होते. या सामन्यात मेग लॅनिंगच्या दिल्ली संघाने स्नेह राणाच्या गुजरात संघाचा सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सला सामना जिंकण्यासाठी 106 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मेग लॅनिंगच्या संघाने अवघ्या 7.1 षटकांत बिनबाद 107 धावा करून सामना जिंकला. शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्ससाठी धडाकेबाज खेळी केली. शेफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. या युवा फलंदाजाने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले.
हे देखील वाचा-