WTC23 Final Venue : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC). या स्पर्धेच्या आगामी दोन्ही हंगामाची फायनल इंग्लंडमध्येच होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम WTC 21 इंग्लंडच्याच साऊदम्पटन मैदानात पार पडला होता. त्यानंतर आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC 2023) चा अंतिम सामना 'द ओव्हल' येथे खेळवला जाईल. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC 25) क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात (Lords) पार पडणार असल्याचं आयसीसीनं (ICC) जाहीर केलं आहे.  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना जूनमध्ये होणार आहे. WTC पॉइंट्स टेबल 2021-23 मध्ये, टॉप-2 स्थानावर असलेले संघ या अंतिम सामन्यात एकमेंकाविरुद्ध असतील. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अव्वल-2 स्थानावर आहेत. यजमान देश इंग्लंड मात्र या क्रमवारीत अत्यंत खालच्या स्थानावर आहे. 

WTC गुणतालिकेत टॉपवर आहे ऑस्ट्रेलिया

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 70 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर टीम इंडियाचा विचार केला असता भारतीय संघ 52.08 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 51.85 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा संघ 50 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचे 25.93 आणि बांगलादेशचे 13.33 टक्के गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकूनही इंग्लंड 38.6 टक्के गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

अशी आहे WTC गुणतालिका

टीम

विजयी टक्केवारी

गुण

विजय

पराभव

अनिर्णित

NR

ऑस्ट्रेलिया

70.00

84

6

1

3

0

दक्षिण आफ्रीका

60.00

72

6

4

0

0

श्रीलंका

53.33

64

5

4

1

0

भारत 

52.08

75

6

4

2

0

पाकिस्तान

51.85

56

4

3

2

0

वेस्ट इंडीज

50

54

4

3

2

0

इंग्लंड

38.60

88

7

8

4

0

न्यूझीलंड

25.93

28

2

6

1

0

बांग्लादेश

13.33

16

1

8

1

0

हे देखील वाचा-