Suryakumar ICC T20 Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं (ICC) टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना पार पडला. ज्यानंतर ही रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. रँकिंगमध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)आणि स्टार अष्टपैलू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) यांना फायदा झाला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) अव्वलस्थानी कायम असून बाबर आझम (Babar Azam) रँकिंगमध्ये घसरला आहे. 





भारत आणि ऑस्ट्रेलिया तसंच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी टी20 सामना पार पडला. यावेळी भारत आणि पाकिस्तान दोघांचा पराभव झाला असला तरी दोन्ही संघानी चांगला खेळ दाखवला. दरम्यान 46 धावांची दमदार खेळी केल्यामुळे सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसंच 71 धावांची स्फोटक खेळी केल्यामुळे हार्दीक पंड्या हा देखील ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानच्या रिझवाननेही अर्धशतक झळकावल्यामुळे तो अव्वलस्थानी कायम असून बाबर आझम मात्र तिसऱ्या स्थानावरुन घसरुण चौथ्या स्थानी पोहोचला आहे. 


आयसीसीचं ट्वीट-






कशी आहे टॉप 10?


पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान 825 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम 792 गुणांसह असून तिसऱ्या स्थानावर भारताचा सूर्यकुमार यादव 780 गुणांसह आहे. चौथ्या स्थानावर पुन्हा पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम 771 गुणांसह आहे. तर इंग्लंडचा डेविड मलान 725 गुणांसह आहे. सहाव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा आरॉन फिंच 715 गुणांसह तर सातव्या आणि आठव्या स्थानावर अनुक्रमे न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे (683) आणि श्रीलंकेचा पाथुम निसंका (677) विराजमान आहेत. तसंच नवव्या स्थानी युएईचा मुहम्मद वसिम 671 आणि दहाव्या स्थानी रीझा हेंड्रीक्स 628  गुणांसह आहे.  


हे देखील वाचा-