World Test Championship 2023-25 Point Table: ऑस्ट्रेलियानं (Austrelia) न्यूझीलंडला (New Zealand) दुसऱ्या कसोटीत पराभव करुन दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्विप दिला. मात्र, तरिही सलग दोन सामने जिंकणारा ऑसी संघ (Team Austrelia) टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला (Team India) मागे टाकू शकला नाही. टीम इंडियानं काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेत पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकत टीम इंडियानं मालिका आपल्या खिशात घातली. टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली आहे. तर न्यूझीलंडचा सूफडा साफ करणारा कांगारूंचा संघ पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 


जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (2023-25) च्या सध्याच्या सायकलमध्ये टीम इंडियानं 9 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी 6 सामने टीम इंडियानं गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताची विजयाची टक्केवारी 68.51 आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 8 कसोट्या जिंकल्यात, 3 कसोट्या गमावल्या आणि एक कसोटी अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. न्यूझीलंडचा संघ यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यानं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळलेत. 6 सामन्यात न्यूझीलंडनं 3 कसोटी सामने जिंकलेत आणि 3 कसोट्या हरलेत. किवी संघाची विजयी टक्केवारी 50 आहे. 


बांगलादेश 50 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान 36.66 टक्के विजयासह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेशनं 2 सामने खेळले आहेत, ज्यात एक सामना जिंकला आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. या चक्रात पाकिस्ताननं आतापर्यंत 5 कसोट्या खेळल्या आहेत, ज्यात 2 कसोट्या जिंकल्या आणि 3 पराभव पत्करावा लागला. 


टीम इंडियाकडे सलग तिसऱ्यांदा फायनल जिंकण्याची संधी 


टीम इंडियाकडे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची संधी आहे. यापूर्वी भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन फायनल्स खेळल्या आहेत. 2019-21 च्या फायनलमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरोधात फायनल खेळली होती. त्यानंतर 2021-23 मध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात फायनल झाली होती. मात्र, दोन्ही वेळा टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा किताब पटकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आता पुन्हा एकदा, म्हणजेच सलग तिसऱ्यांदा भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. आता टीम इंडिया 2023-25 ​​च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Champions Trophy 2025: टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर? चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल PCB ला सतावतेय भीती