World Cup 2023 Final Team India : रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकात कमाल केलीय. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढलं आणि विश्वचषकात सलग दहावा विजय साजरा केला. न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयानं भारताला विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवून दिलंय. भारतीय संघाने चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. तर 2003 मध्ये उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात बाजी मारत भारताने फायनलचे तिकिट मिळवलेय. विजयानंतर भारतीय चाहत्यांसोबत खेळाडूंनीही जल्लोष केला. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील माहौल जबराट होता. भारतीय खेळाडूंनी विजय एन्जॉय केल्याचे दिसले. स्टेडियममधून टीम इंडिया हॉटेलला रवानी झाली, त्यानंतर ते आज अहमदाबादला जाणार आहेत.


भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतरचा एक एक प्रसंग दिसतोय. भारतीय संघाने विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कसा जल्लोष केला. काय माहौल होता.. बॅटवर ऑटोग्राफ केले. एकदुसऱ्यांची गळाभेट केली. त्याशिवाय युजवेंद्र चहल याचीही ड्रेसिंग रुममध्ये आला होत. युजवेंद्र चहल भारताचा उपांत्य फेरीतील सामना पाहण्यासाठी मुंबईत आला होता. सामन्यानंतर चहलने ड्रेसिंगरुमध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. विराट कोहलीसोबत गळाभेट घेतली. चहलसोबत गप्पा मारल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहे. 


अश्विन याने मोहम्मद शामीचे खास अंदाजात अभिनंदन केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. सामन्यानंतर शेकडो चाहत्यांनी टीम इंडियाच्या घोषणा दिल्या. स्टेडियमबाहेर आणि हॉटेलमध्येही चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांची सुरक्षाव्यवस्थाही मोठी होती. 
 
पाहा व्हिडीओ...
 






सामन्यात काय झालं ? 


IND vs NZ World Cup 2023 : वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारातने फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहली अन् श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शामीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. मोहम्मद शामीने न्यूजीलंडच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांपर्यंत मजल मारु शकला. शामीने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. डॅरेल मिचेल याने 134 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.