Ravichandran Ashwin on Sanju Samson : विश्वचषकासाठी दोन महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहेत. प्रत्येक संघ तयारी करत आहे. भारतीय संघाचीही तयारी सुरु आहे. टीम इंडिया आपल्या कॉम्बिनेशनवर काम करत आहे. 15 जणांच्या चमूमध्ये कोण कोण असेल.. याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यातच आर. अश्विन याने संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य केलेय. 


वेस्ट इंडिज दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळणारा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन विश्वचषकात टीम इंडियाचा भाग नसेल. याबाबत अश्विन याने स्पष्ट शब्दात सांगितलेय. अश्वि याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हे वक्तव्य केले. अश्विन म्हणाला की,  "वेस्ट इंडीजविरोधात वनडे मालिकेत भारतीय संघाने अनेक खेळाडूंना संधी दिली. यामध्ये संजू सॅमसन याचाही समावेश होता. संजू सॅमसन याने वनडे मालिकेत अर्धशतक ठोकले. त्याला मीडल ऑर्डरमध्ये फलंदाजीला उतरवले होते. आयपीएलमध्ये तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. संजूचे एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड चांगलेय. त्याची फलंदाजाची सरासरीही चांगली आहे.  वेस्ट इंडीजच्या विरोधात तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिजची फिरकी कमकुवत वाटायला लागली होती. ही त्याची खासियत होय." 



अश्विन म्हणाला की,  " भारतीय संघामध्ये तीन आणि चौथ्या क्रमांकाची जागा खाली नाही.  संजू सॅमसन याच्या कामगिरीने सर्वजण प्रभावित झाले आहेत. संजू कोणत्याही क्षणी खेळाचे स्वरुप बदलू शकतो.  संजू एक शानदार खेळाडू आहे. सध्या टॉप 4 फलंदाजामध्ये त्याला स्थान आहे. विश्वचषकानंतर संजू सॅमसन याला टीम इंडियात स्थान मिळेल का? हे पाहावे लागेल. "


अश्विन पुढे म्हणाले की,  "विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे.  रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरतील... श्रेयस अय्यर आणि केएल राहुल फिट झाल्यात जमा आहेत. आपल्याला एक बॅकअप विकेटकीपर फलंदाजाची गरज आहे. संजू सॅमसन ही भूमिका चांगल्या पद्धतीने बजावू शकतो. संजू भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या इमरजेंसी प्लानमध्ये असू शकतो."