Nasser Hussain On Indian Bowling Attack :  विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे.  15 नोव्हेंबर रोजी वानखेडेच्या मैदानावर या दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाने साखळीतील सर्वच नऊ सामने जिंकून स्पर्धेत वर्चस्व दाखवलेय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसलाय. भारताच्या भेदक माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला एकदाही 300 धावांपर्यंत पोहचता आले नाही. भारताच्या गोलंदाजीचे जगभरातून कौतुक होतेय. उपांत्य फेरीच्या सामन्याआधी इंग्लंडच्या दिग्गज माजी खेळाडूनेही भारताच्या गोलंदाजीचे कौतुक केलेय. 


इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन भारतीय गोलंदाजांचा फॅन झालाय. त्यांनी आताच्या गोलंदाजीला भारताच्या क्रिकेट इतिहिसातील बेस्ट गोलंदाजी असल्याचे म्हटलेय. नासिर हुसेन यांच्या मते,  2000 च्या दशकात भारताकडे 'फॅब 5' फलंदाज होते, पण आता गोलंदाजी सर्वोत्तम आहे. भारताचे तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात भारताच्या सलग नऊ विजयांमध्ये या पाच जणांचे महत्त्वाचे योगदान होते. या पाच गोलंदाजांपुढे प्रतिस्पर्धी ढेर झालेत. 


 स्टार स्पोटर्ससोबत बोलताना नासीर हुसेन  म्हणाले की,  "भारताचे सध्याचे बॉलिंग युनिट आतापर्यंत सर्वोत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे अनेक चांगले गोलंदाज होते पण यावेळी युनिट म्हणून ते सर्वोत्कृष्ट आहेत. जर तुम्ही बुमराहपासून वाचलात तर सिराज बाद करतो. तुम्ही सिराजला टाळलं तर शमीला कसे टाळाल? या तिघांना टाळले तर फिरकीपटू तुमची विकेट घेतात. सध्याची भारताची गोलंदाजी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. 


 नासीर हुसेन यांनी भारताच्या गोलंदाजांची तुलना 2000 च्या दशकातील पाच भारतीय फलंदाजांशी केली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण. तो म्हणाला, "त्यावेळी बॅटिंगमध्ये फॅब 5 होते आणि आता बॉलिंगमध्ये फॅब 5 आहेत."


भारतीय गोलंदाजांचा दबदबा -