लंडन : इंग्लंडने बांगलादेशचा 106 धावांनी धुव्वा उडवून यंदाच्या विश्वचषकातला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंडने या सामन्यात बांगलादेशसमोर 387 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडच्या अचूक माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 280 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या शाकिब अल हसननं 119 चेंडूत 121 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुश्फीकुर रहीमने 44, महमदुल्लाहने 28 आणि मोसाद्देक हुसेनने 26 धावांची खेळी केली. मात्र बांगलादेशला इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर केवळ 280 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी तीन तर मार्क वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी इंग्लंडनं 50 षटकांत सहा बाद 386 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडचा आजवरच्या विश्वचषक इतिहासातला तो उच्चांक ठरला. यंदाच्या विश्वचषकातही इंग्लंडनं सर्वाधिक धावांचा डोंगर उभा करण्याचा मान मिळवला. सलामीच्या जेसन रॉयचं शतक इंग्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. रॉयनं वन डे कारकीर्दीतलं नववं शतक झळकावलं.
जेसन रॉयनं 153 धावांची खेळी साकारली. जेसन रॉय हा यंदाच्या विश्वचषकातला चौथा शतकवीर ठरला. जो रुट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनीही फटकेबाजी करत संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. रॉयसह जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलरनंही अर्धशतकं झळकावून इंग्लंडला धावांचा डोंगर उभारून दिला. दिली. बेअरस्टोनं 51 तर बटलरनं 64 धावांची खेळी उभारली.
World Cup 2019 ENGvBAN : इंग्लंडकडून बांगलादेशचा 106 धावांनी धुव्वा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2019 01:53 PM (IST)
जेसन रॉय हा यंदाच्या विश्वचषकातला चौथा शतकवीर ठरला आहे. रॉयने 153 धावांची खेळी साकारली. रॉयचं वन डे कारकीर्दीतलं हे नववं शतक ठरलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -