Women's T20 World Cup 2024: आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात शारजाह येथे होणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईत 4 ऑक्टोबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला एकूण 4 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ दुबईत तीन आणि शारजाहमध्ये एक सामना खेळणार आहे.


टीम इंडिया पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. भारताचा तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध आहे. हा सामना 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 13 ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे. 


महिला T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 17 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळवला जाईल. दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे खेळवला जाईल. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर उर्वरित तीन गटांचे सामने सायंकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवले जातील.


टीम इंडियाची धुरा हरमनप्रीत कौरकडे-


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला टी-20 विश्वचषकासाठी संघाचीही घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांना स्थान मिळाले आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया आणि पूजा वस्त्राकर यांचाही या संघात समावेश आहे. रेणुका सिंग, हेमलता आणि शोभना यांनाही संधी मिळाली आहे. टीम इंडियात राधा यादवचाही समावेश आहे.


महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चे संपूर्ण वेळापत्रक-


3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा
4 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा
5 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा
6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
6 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा
8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा
9 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
10 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा
11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
12 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा
12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
13 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
17 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 1, दुबई
18 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 2, शारजाह
20 ऑक्टोबर : फायनल, दुबई


संबंधित बातमी:


Vinesh Phogat on PT Usha : "पी. टी. उषा मला भेटण्यासाठी नाही तर फोटो काढण्यासाठी आल्या होत्या",  विनेश फोगाटचा गंभीर आरोप