Womens Asia Cup 2022: सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma), स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) फटकेबाजी आणि जेमिमाह रॉड्रिग्जच्या (Jemimah Rodrigues) फिनिशिंग टचमुळं भारतीय महिला संघानं बांग्लादेश समोर 160 धावांचं आव्हान ठेवलं. शेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) सुरु असलेल्या महिला आशिया चषकातील पंधराव्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या.


ट्वीट-






 


बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघानं झंझावाती सुरुवात करताना 10 षटकांत एकही विकेट्स न गमावता संघाची धावसंख्या 91 वर पोहचवली. त्यानंतर पुढच्या 10 षटकात भारतीय संघाला फक्त 68 धावा करत्या आल्या. भारताकडून शेफाली वर्मानं सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तर, स्मृती मानधनानं 47 धावांचं योगदान दिलं. सामन्याच्या अखेरिस जेमिमाह रॉड्रिग्सनं नाबाद 35 धावांची खेळी केली. भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून बांग्लादेशसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं. बांग्लादेशकडून रुमाना अहमदनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सल्मा खातूनं खात्यात एक विकेट्स जमा झाली. दरम्यान, बांग्लादेश समोर ठेवलेलं 160 धावांचं लक्ष्य भारतीय संघ कशाप्रकारे रोखणार? हे सामन्याच्या शेवटी स्पष्ट होईल. 


भारताची प्लेइंग इलेव्हन:
स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, सभिनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकिपर), किरण नवगिरे, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड. 


बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:
मुर्शिदा खातून, फरगाना होक, निगार सुलताना (कर्णधार/विकेटकिपर), रितू मोनी, लता मोंडल, फहिमा खातून, रुमाना अहमद, नाहिदा अक्‍टर, सलमा खातून, फरीहा त्रिस्ना, शांजिदा अक्‍टर.


हे देखील वाचा-