India vs Pakistan T20 World Cup 2024 : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिलाच विजय आहे. टीम इंडियाचा विजय नक्कीच झाला आहे, पण त्याचा फारसा फायदा झालेला नाही. मात्र, भारताचे अजून दोन सामने बाकी आहेत ज्यात त्याची भरपाई होऊ शकते. दरम्यान, टीम इंडियासाठी टेन्शनचे कारण म्हणजे नेट रन रेट आहे. 


भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर सहावा विजय मिळवला. याआधी झालेल्या सामन्यांपैकी पाकिस्तानी संघाला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. दरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने आतापर्यंत 14 वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. केवळ तीन सामने पाकिस्तान जिंकला आहे. भारतीय संघाला अजूनही श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत.


टीम इंडियाचा नेट रन रेट अजूनही मायनसमध्ये 


दरम्यान, जर आपण पॉइंट टेबलबद्दल बोललो तर भारतीय संघाचा नेट रन रेट अजूनही मायनसमध्ये आहे. या सामन्याआधी भारताचा नेट रन रेट -2.900 होता, जो आता किंचित वाढून -1.217 झाला आहे. यासोबतच टीम इंडिया आता श्रीलंकेला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आली आहे. श्रीलंकेच्या संघाने आपले दोन्ही सामने गमावले आहे. त्यांचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. दरम्यान, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर या सामन्यापूर्वी संघाचा नेट रन रेट +1.550 होता, जो आता 0.555 वर आला आहे. पण तरीही संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.


टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या गटाबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडचा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि तो जिंकला आहे, त्याचा नेट रन रेट +2.900 आहे. ऑस्ट्रेलियन संघ एका सामन्यातून दोन गुण आणि +1.908 च्या धावगतीने दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. याचाच अर्थ भारताला इथून बाकीचे दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील, एकही सामना हरला तर उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण होईल.  


हे ही वाचा -


Ind vs Ban 1st T20 : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! दोन स्टार खेळाडूंचे पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11


Ind vs Pak Video : अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... रिचा घोषने एका हातात घेतला जबरदस्त कॅच, पाकिस्तानी खेळाडूंना बसेना विश्वास