IND vs AUS, Test Proabable 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना उद्यापासून (9 फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. या सामन्यासह नेमकी कोणाकोणाला अंतिम 11 मध्ये संधी मिळणार याची उत्सुकता देखील क्रिकेट रसिकांना आहे. दरम्यान सामने भारतात असल्याने टीम इंडिया अंतिम 11 मध्ये तीन फिरकीपटूंना खेळवू शकते. याशिवाय फॉर्मात असलेले फलंदाज असणार असून पंतच्या जागी ईशान किशन किंवा केएस भरतला संधी मिळू शकते.
भारतीय कॅम्प तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे प्लेईंग इलेव्हनचा भाग असू शकतात. या तिन्ही खेळाडूंमध्ये सामना पलटण्याची क्षमता आहे आणि त्यांची अलीकडची कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे त्यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. यासोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे देखील प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतात. तसंच शुभमन, विराट यांना नक्कीच संधी मिळेल, पुजारानेही काऊन्टी क्रिकेट अलीकडे गाजवल्यामुळे तो संघात असू शकतो. तसंच ईशान आणि भरतमध्ये अंतिम 11 मध्ये केएस भरतचा समावेश होऊ शकतो. कारण आंध्र प्रदेशच्या या खेळाडूने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 135 डावांमध्ये 4707 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतकं आणि 27 अर्धशतकं केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-