India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी तपासून पाहिली. पण ही तपासणी स्मिथला थोडी महागात पडली. ऑस्ट्रेलिया क्रिकटने खेळपट्टीच्या तपासणीचे फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंवरून काही नेटकऱ्यांनी स्मिथचे भन्नाट मीम्स शेअर केले आहेत.
तर खेळपट्टीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “एका बाजूची खेळपट्टी कोरडी आहे. मला वाटतं की यात फिरकी गोलंदाजांना फायदा होईल. मला वाटत नाही की विकेटमध्ये बाऊन्स असेल. मला वाटतं की वेगवान गोलंदाजांसाठी खेळणं खूप कठीण असेल आणि खेळ जसजसा पुढे जाईल तसतसं थोडे चढ-उतार असतील.'' दरम्यान स्मिथच्या फोटोवर नेटकऱ्यांनी बनवलेले भन्नाट मीम्स पाहू...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनवरील आतापर्यंतची आकडेवारी
या मैदानात आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने (देशांतर्गत संघ) 4 सामने जिंकले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. येथे एका डावात 610/6 धावांची उच्च धावसंख्या झाली आहे. त्याच वेळी, कमी धावसंख्या 79 धावा आहे. एका डावात गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक 8 विकेट्स आहेत. त्याचबरोबर एका गोलंदाजाने एका सामन्यात सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय नाबाद 253 ही एका फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
स्टीव्ह स्मिथचा फॉर्म
बॉर्डर-गावस्कर मालिकेत स्मिथने आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 28 डावांमध्ये त्याने 72.85 च्या सरासरीने एकूण 1742 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 185 चौकार आणि 9 षटकार निघाले आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 192 आहे.
हे देखील वाचा-