Border Gavaskar Trophy 2024-25 : पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करून दहा वर्षांत प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आमंत्रण न दिल्याने भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर आणि गावसकर यांच्या नावाने ही ट्रॉफी ओळखली जाते. मात्र, रविवारी ऑस्ट्रेलियन संघाला केवळ बॉर्डर यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली. 




त्यावेळी गावसकर मैदानावर उपस्थित असूनही त्यांना बोलावण्यात आले नाही. यानंतर गावसकर म्हणाले, "माझा मित्र अॅलन बॉर्डर याच्यासह मलाही ट्रॉफी देण्यासाठी बोलावले असते तर मला आवडले असते. अखेर ही मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी खेळवली जाते. मी इथेच मैदानात उपस्थित होतो. ऑस्ट्रेलियाने ही मालिका जिंकली असली, तरी त्यांना ट्रॉफी प्रदान करताना मला वाईट वाटले नसते. शेवटी हा खेळ आहे. ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले आणि ते जिंकले. केवळ मी भारतीय असल्याने मला ट्रॉफी प्रदान करण्यास आमंत्रण न देणे हे योग्य नाही," 


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपली चूक मान्य करताना दोन्ही माजी कर्णधारांना मंचावर बोलावणे अधिक योग्य ठरले असते असे म्हटले.


पहिला बीजीटी कोणी जिंकला?


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला 1996 मध्ये सुरू झाली. प्रथमच या ट्रॉफी अंतर्गत फक्त एक कसोटी सामना दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने 7 गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हापासून, दोन्ही संघांमध्ये 17 बीजीटी खेळल्या गेल्या आहेत. 10 भारताने जिंकले आणि 6 ऑस्ट्रेलियाने जिंकले. 2003-04 मध्ये मालिका देखील 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतात 9 वेळा खेळल्या गेले आहे, ज्यात भारताने 8 वेळा जिंकले. ऑस्ट्रेलिया एकदा जिंकला. ऑस्ट्रेलियामध्ये 8 वेळा बीजीटी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विजय मिळवला. भारताने दोनदा विजय मिळवला आणि एकदा मालिका अनिर्णित राहिली.




हे ही वाचा-


Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही