BCCI Update on Jasprit Bumrah : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरली होती. मालिकेतील पहिले दोन सामने खेळलेल्या बुमराहचा प्लेइंग इलेव्हनमधून अचानक पत्ता कट झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत अपडेट देत बुमराह तिसरा टी-20 सामना का खेळत नसल्याचे कारण स्पष्ट केले आहे.
बुमराह पुढील सामने खेळणार की नाही?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील 100 विकेट्सचा टप्पा गाठला होता. मात्र, धर्मशालामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी तो वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला असून, त्यामुळे या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता. बुमराह या मालिकेतील उर्वरित सामने खेळणार की नाही, याबाबत बीसीसीआयने लवकरच अधिक माहिती दिली जाईल, असेही या अपडेटमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षर पटेलही आजारपणामुळे या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
नाणेफेकीवेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केले की, जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला असून, त्यामुळे तो या महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर बीसीसीआयनेही अधिकृत निवेदन जारी करत या माहितीला दुजोरा दिला आहे. सध्या तरी बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर पडणार की नाही, याबाबत कोणतीही अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या पुढील अपडेटकडे आता चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजीच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 177 धावांत गुंडाळता आले. त्यानंतर भारताने 15.5 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 120 धावा करून सामना जिंकला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 18 चेंडूंत 35 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक आणि शुभमन गिलने भारताला तुफानी सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा ठोकल्या. भारताने पुन्हा प्रयोग केला, सूर्यकुमार यादवच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आला. तिलक आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 32 धावा केल्या, परंतु गिलला मार्को जॅनसेनने बाद केले. गिलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता.
कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला, त्याने 12 धावा केल्या. त्यानंतर तिलक आणि शिवम दुबे यांनी भारताचा विजय पूर्ण केला. तिलकने 34 चेंडूत तीन चौकारांसह 25 धावा काढल्या आणि शिवमने चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारून 10 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जानसेन आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
हे ही वाचा -