Sachin Tendulkar gifts Messi Indian Jersey : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून कोलकाता आणि हैदराबादनंतर तो रविवारी मुंबईत आला. मुंबईत त्याने विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी तो वानखेडे स्टेडियममध्येही पोहोचला, जिथे त्याला पाहण्यासाठी प्रचंड संख्येने चाहत्यांची गर्दी केली होती. वानखेडे स्टेडियममध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय फुटबॉल संघाचे दिग्गज सुनील छेत्री यांची उपस्थिती होती.

Continues below advertisement

फडणवीसांकडून ‘प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ

Continues below advertisement

मेस्सीने आपल्या चार शहरांच्या ‘जी.ओ.ए.टी. इंडिया टूर’मधील तिसऱ्या टप्प्यावर वानखेडे स्टेडियममध्ये जवळपास एक तास घालवला. यादरम्यान त्याने युवा फुटबॉलपटू, क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलचे दिग्गज सुनील छेत्री तसेच मनोरंजन विश्वातील नामवंत व्यक्तींशी संवाद साधला. याच कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रोजेक्ट महादेवा’ची घोषणा केली. 

सचिन...सचिन...; क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर आवाज घुमला

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये लिओनेल मेस्सी आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची एकत्र उपस्थिती भारतीय क्रीडा इतिहासातील आणखी एक गौरवशाली क्षण ठरला. सचिन तेंडुलकर मैदानात येताच संपूर्ण वानखेडे पुन्हा एकदा “सचिन… सचिन…”च्या घोषणांनी दुमदुमून गेलं. वर्षानुवर्षे क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनसाठीचा तो प्रेमाचा आवाज आजही तितकाच जिवंत असल्याचं या क्षणाने दाखवून दिलं. क्रिकेट आणि फुटबॉल, दोन वेगवेगळ्या खेळांचे दोन महानायक एका फ्रेममध्ये आले. सचिनसाठी हे चाहत्यांचं प्रेम पाहून मेस्सीही काही काळ शांतपणे ते दृश्य पाहत बसलेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

या खास प्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी आपल्या स्वाक्षरीसह 10 नंबरची जर्सी मेसीला भेट दिली, तर अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार मेस्सीने त्याबदल्यात सचिनला फुटबॉल भेट देत या ऐतिहासिक क्षणाला खास रंगत आणली. 

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?  

सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी या मैदानावर अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. आपण जसं म्हणतो, मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि इथे असंख्य स्वप्नं पूर्ण झाली आहेत. तुमच्या पाठिंब्याशिवाय 2011 साली या मैदानावर ते सुवर्णक्षण पाहणं शक्य झालं नसतं. आज या ठिकाणी तीन महान खेळाडूंची उपस्थिती असणं हे मुंबई, मुंबईकर आणि संपूर्ण भारतासाठी खरोखरच सुवर्णक्षण आहे. ज्या पद्धतीने तुम्ही या तिन्ही दिग्गज खेळाडूंचं स्वागत केलं, ते अतिशय अद्भुत आहे.”

लिओनेल मेस्सीबद्दल सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

लिओनेल मेस्सीबद्दल बोलताना सचिन म्हणाले की, “मेस्सीच्या खेळाविषयी बोलण्यासाठी हा मंचही अपुरा आहे. कारण त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांनी खेळात सगळं काही मिळवलं आहे. त्यांच्या मेहनतीची, जिद्दीची, शिस्तबद्धतेची आपण मनापासून प्रशंसा करतो. मुंबईकर आणि भारतीयांच्या वतीने, मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. येथे येऊन तरुणांना प्रेरणा दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.”

हे ही वाचा -

Amruta Fadnavis-Lionel Messi : मेस्सी, मिसेस मुख्यमंत्री अन् तो खास क्षण... वानखेडेवर जे घडलं, ते अविस्मरणीय!, अमृता फडणवीसांचा सेल्फी व्हायरल