India vs Australia 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील अखेरचा सामना आता पार पडणार आहे. हैद्राबादमध्ये पार पडणारा हा सामना निर्णायक असणार आहे. कारण तीन टी20 सामन्यांच्या (India vs Australia T20 Series) मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने (Team Australia) जिंकल्यावर दुसरा सामना भारताने (Team India) जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. तर आजचा कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
उद्या अर्थात 25 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ -
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
हे देखील वाचा-