Gary Kirsten Resigns News : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे. अलीकडेच बाबर आझमच्या जागी मोहम्मद रिझवानला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आले. पण आता दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणातच भारतीय संघाने 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यांचा पाकिस्तानसोबतचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही.
सहा महिन्यांत दिला राजीनामा
गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल 2024 मध्येच कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर केवळ 6 महिने राहू शकले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच प्रशिक्षकाकडून निवडीचे अधिकार काढून घेतले होते आणि त्यांना निवड समितीचा भागही बनवण्यात आले नव्हते.
कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तानी क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि संघाला गट सामन्यातूनच बाहेर पडावे लागले. यानंतर बाबर आझम यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोहम्मद रिझवानला पाकिस्तानचा नवा मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आला आहे.
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. मात्र गॅरी कर्स्टन यांच्या जागी प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोण घेणार हे अद्याप ठरलेले नाही. पाकिस्तानी कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांना तिन्ही फॉरमॅटचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.
निवडकर्ता आकिब जावेदही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. आगामी काळात पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करायचे आहे. आयसीसीचे यजमानपद पाकिस्तानला बऱ्याच काळानंतर मिळाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला मर्यादित षटकांच्या प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा -