West Zone Announced Their Squad For Duleep Trophy 2025 : बीसीसीआयने दिलीप करंडक स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर आता संघांच्या कर्णधारांची नावंही स्पष्ट होऊ लागली आहेत. यंदाही या प्रतिष्ठित स्पर्धेत पारंपरिक पद्धतीप्रमाणे 6 विभागीय संघ सहभागी होणार आहेत. ताज्या घडामोडीनुसार, वेस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, अनुभवी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना मात्र संघात स्थान मिळालेले नाही. 

शार्दुलच्या नेतृत्वाखाली खेळतील श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल

वेस्ट झोन संघात शार्दुल ठाकूरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांच्यासारखे दमदार खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यापैकी अनेक खेळाडू भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत, किंवा खेळण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

रहाणे, पुजाराला स्थान नाही!

यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतंय ते अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला डावलण्यात आले आहे. हे दोघंही गेल्या काही वर्षांत वेस्ट झोनसाठी सातत्याने खेळत होते. मात्र, यावेळी त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे संकेत मिळत आहेत की आता दिलीप ट्रॉफीसारख्या स्पर्धेसाठीही या दोघांसाठी दरवाजे बंद होऊ लागले आहेत. भविष्यात काही बदल झाला तर वेगळी गोष्ट, पण सध्यातरी स्थिती गंभीर आहे.

28 ऑगस्टपासून रंगणार स्पर्धा

दिलीप करंडक स्पर्धेची सुरुवात 28 ऑगस्टपासून होणार आहे. उद्घाटन सामन्यात नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. त्याच दिवशी आणखी एक सामना खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा पूर्णपणे कसोटी (टेस्ट) स्वरूपात खेळवली जाणार आहे आणि अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळत स्पर्धेत पुढे जातील.

दुलीप ट्रॉफीमध्ये 6 झोनमधील संघ खेळतील

दुलीप ट्रॉफीमध्ये 6 झोनमधील संघ खेळताना दिसतील. यामध्ये नॉर्थ झोन, ईस्ट झोन, नॉर्थ-ईस्ट झोन, साउथ झोन, वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांचा समावेश आहे. 

वेस्ट झोन संघ (दिलीप ट्रॉफी 2025-26 ) : शार्दुल ठाकूर (कर्णधार, मुंबई), यशस्वी जैस्वाल (मुंबई), आर्य देसाई (गुजरात), हार्विक देसाई (यष्टीरक्षक, सौराष्ट्र), श्रेयस अय्यर (मुंबई), सर्फराज खान (मुंबई), ऋतुराज गायकवाड (महाराष्ट्र), जैतराज पटेल (गुजरात), सौरभ नवले (यष्टीरक्षक, गुजरात), शम्स मुलानी (मुंबई), तनुष कोटियन (मुंबई), धर्मेंद्रसिंह जडेजा (सौराष्ट्र), तुषार देशपांडे (मुंबई), अर्जन नागवासवाला (गुजरात).

हे ही वाचा - 

Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराह ओव्हल टेस्टमधून टीमला सोडून गेला निघून… बीसीसीआयची घोषणा, काय आहे या निर्णयामागचं कारण?