एंटिगा : वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने युवराज सिंह आणि हर्षल गिब्स यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्य़ाच्या विक्रमाशी पोलार्डने बरोबरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पोलार्डने हा कारनामा केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात अकीला धनंजय याच्या ओव्हरमध्ये पोलार्डने सहा षटकार लगावले.
अकीला धनंजयच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावले. मात्र विशेष बाब म्हणजे अकीला धनंजयने या सामन्यात हॅटट्रीक देखील घेतली. अकीला धनंजयने इविन लुईस, ख्रिस गेल, निकोलस पुरन यांना आऊट केलं. धनंजयने पहिल्या सामन्यात चार ओव्हर्समध्ये 62 धावा दिल्या.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात प्रथम फंलदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने 131 धावांचं लक्ष्य वेस्ट इंडिजसमोर ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने अवघ्या 13.1 ओव्हरमध्ये चार विकेट्सने सामना जिंकला. पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
युवराज सिंहने 19 सप्टेबर 2007 रोजी टी 20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा चेंडूंवर सहा षटकार लगावले होते. हर्षल गिब्सने एकदिवसीय सामन्यात हा कारनामा केला होता. गिब्सने नेदरलँडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सहा षटकार लगावले होते. लेग स्पिन डान वेग बंग याच्या गोलंदाजीवर गिब्सने षटकार लगावले होते.