Devon Thomas :सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. तसेच वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाची चर्चा सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आयसीसीने 34 वर्षीय कॅरेबियन क्रिकेटर डेव्हन थॉमसवर  ( Devon Thomas ) 5 वर्षांसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. 


डेव्हन थॉमसने कबूल केले आहे की, त्याने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी), अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) च्या 7 अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केले आहे. यामुळे आयसीसीने त्याच्यावर कडक कारवाई करत त्याला 5 वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


आयसीसीने गेल्या वर्षी मे महिन्यात डेव्हन थॉमसला 7 आरोपांवरून निलंबित केले होते, मात्र आता त्याच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोपही करण्यात आला होता आणि त्याला स्वतःचे स्पष्टीकरण देण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली होती.


आयसीसीने जाहीर केले पत्र-


आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे महाव्यवस्थापक ॲलेक्स हेल्स यांनी एक पत्र जारी करताना सांगितले की, "आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट व्यावसायिकपणे खेळलेल्या डेव्हॉन थॉमसने भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये भाग घेतला होता. त्याला याची जाणीव होती की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट' या संस्थेच्या अंतर्गत भ्रष्टाचार संहिता त्याच्या जबाबदाऱ्या काय होत्या. पण तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे आणि ही बंदी योग्यरित्या लागू करण्यात आली आहे आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर खेळाडूंनाही संदेश देतो की असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.






डेव्हन थॉमसची कारकीर्द-


डेव्हन थॉमस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी फक्त 1 कसोटी सामना खेळू शकला, ज्यामध्ये त्याने 31 धावा केल्या आणि 2 बळीही घेतले. वेस्ट इंडिजसाठी 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 238 धावा करण्यासोबतच त्याने 2 बळीही घेतले. तर 12 टी-20 सामन्यांमध्ये थॉमसला केवळ 51 धावा करता आल्या. 2022 मध्ये तो शेवटचा वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसला होता.


संबंधित बातम्या:


IPL 2024 Travis Head: बॅट हवेत असूनही ट्रॅव्हिस हेडला अम्पायरने नाबाद दिले; इरफान पठाण म्हणाला, हे भयानक..., पाहा Video


Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?


विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?